बोदवड : शहरातील रहिवासी तथा हार्डवेअर व्यापारी कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधत दरवाजाचे कडीकोयंडा तोडून दोन लाख 77 हजारांचा ऐवज लांबवल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील गोमाता नगर व जुना सोनोटी रस्त्यावर रुपेश दामोदर गांधी (42) हे हार्डवेअर व्यावसायीक कुटूंबासह वास्तव्यास आहेत.
बंद घरे चोरट्यांना पर्वणी
6 ते 12 एप्रिलदरम्यान गांधर कुटुंब बाहेरगावी गेल्यानंतर चोरट्यांनी कुलुप तोडून घरात प्रवेश करीत कपाटातून 70 हजारांचे पैंजण, 15 हजारांच्या चांदीच्या बिछुड्या, 28 हजारांचे चांदीचे शिक्के, 24 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी, 30 हजार रुपये किंमतीची अंगठी, दोन हजार रुपये किंमतीची चांदीची कटोरी, 15 हजार हजार रुपये किंमतीचे कानातील तीन गुढे, 93 हजार 300 रुपयांची रोकड असा एकूण दोन लाख 77 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. गांधी कुटुंब 6 एप्रिल रोजी गांधी कुटूंब गावाला गेल्यानंतर घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी किंमती मुद्देमाल लांबवला तर 12 रोजी गावाहून आल्यानंतर घरफोडीचा प्रकार लक्षात आल्यानंतर बोदवड पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले मात्र चोरट्यांचा माग निघू शकला नाही. या प्रकरणी रूपेश गांधी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.