---Advertisement---

जळगावात पती-पत्नीच्या नात्याला काळिमा, पतीने पत्नीसोबत केले अनैसर्गिक कृत्य

---Advertisement---

जळगाव : शहरामध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. विकृत पतीने पत्नीसोबत तब्बल वर्षभर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी पतीविरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रानुसार, शहरातील एका परीसरात 30 वर्षीय विवाहिता आपल्या परीवारासह वास्तव्यास आहे. 27 जानेवारी 2022 पासून 35 वर्षीय पती पीडित पत्नीला वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य करण्यास बळजबरी करीत होता. या कृत्याला पीडीतेने विरोध केला असता तिला शिविगाळ, मारहाण करण्यात आली तसेच मारून टाकण्याची धमकीही देण्यात आली.
दरम्यान, त्रास असह्य झाल्यानंतर पीडीत विवाहितेने 1 फेब्रुवारी 2023 रोजी शनिपेठ पोलिसात धाव घेत विकृत पती विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहे. 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment