लक्ष द्या : ‘ही’ बातमी खूपच महत्वाची आहे, ‘या’ योजनांच्या नियमांत मोठा बदल; कोणत्या, काय?

Scheme : केंद्रीय अर्थमंत्रालयाने सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व योजनांच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अर्थमंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत अधिसूचना देखील जारी केली आहे. आता या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी  पॅनकार्ड आणि आधारकार्ड आवश्यक करण्यात आले आहेत.

कोणत्या योजना?
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सुकन्या समृद्धी योजना (SSY), महिला सन्मान योजना. या योजनांच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले  आहे. तसेच पोस्ट ऑफिसमध्ये देखील गुंतवणूक केली असेल तर यामध्ये देखील बदल करण्यात आले  आहे. अर्थमंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत अधिसूचना देखील जारी केली आहे.

काय बदल?
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हे बदल सरकारद्वारे जारी केलेल्या अल्प बचत योजनेसाठी केवायसी (KYC) म्हणून वापरले जाणार आहेत. याआधी तुम्ही या बचत योजनांमध्ये आधारकार्ड क्रमांकाशिवाय पैसे जमा करु शकत होता. पण आता या योजनांमध्ये कोणत्याही प्रकराची गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणुकदारांना आधारकार्ड क्रमांक द्यावा लागणार आहे. तसंच, एका मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यासाठी त्यांना पॅनकार्ड देखील दाखवावे लागणार आहे.

पोस्ट ऑफिस बचत योजनेसाठी खाते उघडताना तुमच्याकडे आधारकार्ड क्रमांक नसल्यास तुम्हाला आधार कार्डसाठी नोंदणी स्लिपचा पुरावा द्यावा लागेल. त्यासोबतच गुंतवणूकदाराला या लघु बचत योजनांच्या गुंतवणुकीशी जोडण्यासाठी खाते उघडल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आतमध्ये आधार क्रमांक द्यावा लागेल.

लघु बचत योजना खाते उघडण्यासाठी आवश्यक  कागदपत्र
पासपोर्ट साइज फोटो, आधारकार्ड क्रमांक किंवा आधार नोंदणी स्लिप, पॅनकार्ड क्रमांक

महत्वाचे म्हणजे, जर विद्यमान गुंतवणूकदारांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पॅनकार्ड आणि आधारकार्ड सादर केले नाही तर त्यांचे खाते 1 ऑक्टोबर 2023 पासून बॅन केले जाईल. त्यामुळे या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी या सर्व गोष्टींची नोंद घेत वेळीच त्यांचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड सादर करावे.