---Advertisement---

गावठी कट्टयासह काडतुसे बाळगणाऱ्या संभाजीनगरच्या एकाला धुळ्यात अटक

---Advertisement---

धुळे : तालुका पोलिसांनी अवैधरित्या गावठी कट्टयासह काडतुसे बाळगल्याप्रकरणी संभाजीनगर येथील एका तरूणाला बेड्या ठोकल्या. त्याचेकडून एक गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुसे असे ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २८ रोजी मध्यरात्री साडेअकराच्या दरम्यान आर्वी येथील उड्डाणपुलाच्या पुढे असलेल्या पेट्रोलपंपानजीक एका मालेगांवच्या दिशेने जात असतंना संशयित अतिक रफिक शेख (वय २७ रा.इंदीरा नगर नवगजी पार्क वैजापुर जि. संभाजीनगर) याची पथकाने झडती घेतली असता त्याचे बॅगेतून बेकायदेशीररित्या विनापरवाना देशी बनावटीचे एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ३७ हजार रूपये किमतीचे अग्नीशस्त्रे बाळगतांना आढळून आला.

धुळे तालुका पोलिस ठाणेचे निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मिळाल्यानंतर कारवाईसाठी पथक सज्ज झाले होते. याप्रकरणी रविंद्र भिमराव सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अतिक शेखविरोधात तालुका पोलिस ठाण्यात आर्मअॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक छाया पाटील करीत आहेत. या घटनेची कसुन चौकशी तालुका पोलिसांकडून केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---