---Advertisement---
जळगाव : मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका इसमाला दुर्दैवी काळाने हेरले. ही घटना जळगाव शहरातील मेहरुण तलावात घडली. काझी अब्दुल वाहीद रईस अहमद (वय ४५, रा. फातेमा मशिदीजवळ मेहरुण) असे मृत इसमाचे नाव आहे.
मासे पकडण्यासाठी गेलेले काझी अब्दुल वाहीद रईस अहमद (वय ४५, रा. फातेमा मशिदीजवळ मेहरुण) हे मेहरुण तलावात बुडाले होते. शोध घेवूनही ते मिळून न आल्याने बुधवारी दुपारच्या सुमारास त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना मिळून आला. त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.
शहरातील मेहरुण परिसरातील फातेमा मशिदीजवळ काझी अब्दुल वाहीद रईस अहमद हे वास्तव्यास होते. मशिदीत काम करुन ते आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास ते मेहरुण तलाव परिसरात रात मासे पकडण्यासाठी गेले होते. मासे पकडत असतांना ते पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती.
ही घटना कोणाच्याच लक्षात आली नाही. तसेच सायंकाळपर्यंत देखील ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र रात्रीपर्यंत ते मिळून आले नव्हते. बुधवारी दुपारच्या सुमारास तलावात बुडालेल्या काझी अब्दुल वाहीद रईस अहमद यांचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना मिळून आला.
याबाबतची माहिती मिळताच नातेवाईकांनी मेहरुण तलाव परिसरात धाव घेतली. त्यानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे. यापक्ररणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
---Advertisement---