तरुण भारत लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२३ । जळगाव शहरातील एमआयडीसीतील जी सेक्टर मधील आकाश प्लास्टिक फॅक्टरीमध्ये शॉर्ट सर्कीटमुळे भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले. ही घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. दोन ते अडीच तासानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
शहरातील अयोध्या नगर येथील रहिवासी खडू किसन पवार यांची औद्योगिक वसाहतीतीत जी-७६ मध्ये आकाश प्लॉस्टिक नावाची फॅक्टरी आहे. या कंपनीमध्ये सोमवारी सकाळी अचानक शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. काही क्षणात आगीने विक्राळ रूप धारण केले. सकाळी सात वाजेच्या सुमारास पवार यांचा मुलगा हा फॅक्टरीमध्ये आला असता त्याला धुराचे लोट पसरले दिसून आले. फॅक्टरीमध्ये आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ मनपाच्या अग्निशमन विभागाला संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तर फॅक्टरीमध्ये आग लागल्याचे कळाल्यानंतर फॅक्टरीचे मालक खडू पवार हे सुध्दा त्याठिकाणी पोहोचले होते. त्यांच्यासह इतर कामगारांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.
घटनेच्या अर्धा ते पाऊण तासानंतर अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन जवानांकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. साधारण दहा बंबांद्वारे आगीवर पाण्याचा मारा करण्यात आल्यानंतर दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले. दरम्यान, या आगीमध्ये प्लॉस्टीक वेस्ट मटेरिअलसह ठिबक नळ्या आणि ठिबक नळ्या तयार करणाऱ्या दोन महागड्या मशिनी जळून खाक झाल्या. तसेच आकाश प्लॉस्टिक बाजूच्या एका कंपनीला सुध्दा आगीची झळ बसली असून तेथील काही पत्रे देखील जळाले आहेत. या आगीमध्ये किमान ४० लाखां