महिलांना सुखद धक्का, आजपासून निम्म्या तिकिट दरात करा बस प्रवास

तरुण भारत लाईव्ह । १७ मार्च २०२३ । एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना आजपासून (शुक्रवार) कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर ‘महिला सन्मान योजना’ म्हणून ओळखले जाईल.

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्के ते 100 टक्के प्रवासी तिकीट दरात सवलत देते. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून मोफत प्रवासाची सुविधा गेल्या वर्षी २५ ऑगस्टपासून सुरु केली. या योजनेचा लाभ आतापर्यंत सुमारे ६ कोटी ज्येष्ठ प्रवाशांना झाला आहे. नवीन योजनेमुळे देखील महामंडळाला कोट्यवधी रुपये शासनाकडून मिळणार आहेत. त्यातून महामंडळाला फायदा होईल.

या सरकारने महिला सन्मान योजनेअंतर्गत एसटी महामंडळाच्या बसेस मधून महिलांना ५० टक्के बस तिकिटात सवलत देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांचा अतिशय उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत असल्याचे आगार व्यवस्थापक विजय पाटील यांनी सांगितले.

प्रवाशी महिलांनी सुद्धा या योजनेबद्दल सांगितले असून या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेला घेता येईल. तसेच ज्या महिला कामानिमित्त नेहमी प्रवास करतात अशा महिलांना ही योजना खूप फायदेशीर ठरेल. शिंदे फडणवीस सरकारला धन्यवाद देऊन महिला प्रवाशांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या