थेट सूर्यनारायणाला शांत करणार शास्त्रज्ञ

तरुण भारत लाईव्ह । २१ फेब्रुवारी २०२३। सद्या संपूर्ण जगासमोर एक मोठी समस्या निर्माण झाली असून, ती म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग अर्थात वातावरणातील बदल. दिवसेंदिवस सूर्याने आग ओकण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यामुळेच या जगन्मित्राला काही प्रमाणात शीतल म्हणजेच थंड करण्यासाठी अमेरिकेतील शास्र्त्रन्यांचा एक गट पुढे सरसावला आहे. मात्र यात सुद्धा दोन मतप्रवाह मतप्रवाह दिसून येत आहे. काही शास्त्रन्यांनी या अभिनव प्रयोगाला विरोध केला आहे. त्याच्या मते, असे धाडस पृथ्वीसाठी धोकादायक आणि विनाशकारी ठरू शकते.

ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी काही शास्त्रन्यांनी एक विचित्र मार्ग शोधला आहे. एका यंत्राच्या सहाय्याने सूर्याची पृथ्वीवर येणारी उष्णता आणि सूर्यप्रकाश कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या यंत्रामुळे किमान सूर्यप्रकाश पृथ्वीवर येईल. याबाबत सध्या संशोधन सुरु असून या प्रकल्पावर आतापर्यंत मोठी गुंतवणूक झाली आहे. सूर्यप्रकाश आणि उष्णता घटविण्याच्या प्रकल्पावर काम सुरु आहे. सूर्याची उष्णता कमी झाल्यास पृथ्वीवरील ग्लोबल वॉर्मिंगच्या मोहिमेत मोठे यश मिळेल असा या शास्त्रन्यांचा दावा आहे.

अशी सुचली कल्पना? 
जून १९१९ मध्ये फिलिपाइन्समधील माऊंट पिटेनाबू या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. २०व्या शतकातील या सर्वात मोठ्या स्फोटातून पसरलेली राख आकाशात सुमारे २८ मैल परिघात पसरली. यानंतर पुढील १५ महिने संपूर्ण जगाचे तापमान सुमारे १ अंशाने कमी झाले होते. वातावरणातील राखेमुळे सूर्याची किरणे पूर्णपणे पृथ्वीवर पोहोचू शकत नव्हती. यातूनच शास्त्रन्याना नवी कल्पना सुचली. सूर्य आणि वातावरण यांच्यात एखादा गोष्टीचा थर उभा राहिल्यास सूर्याची किरणे पूर्ण शक्तीने पृथ्वीपर्यंत पोहोचणार नाहीत असा शास्र्त्रन्यांचा अंदाज आहे.

प्रकल्पाबाबत धोक्याचा इशारा 
सूर्याची उष्णता कमी करण्याच्या या प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक आता या प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक झाल्याने आता या प्रकरणाच्या चर्चेलाही उधाण आले आहे. सूर्यप्रकाश कमी करण्याच्या या संशोधनाला शास्र्त्रन्यानी सोलर जिओ इंजिनीरिंग असे म्हटले आहे. याबातच्या सर्व संभाव्य धोक्यांबाबत काही शास्र्त्रन्यानी इशारा दिल्यानंतरही यावर काम करणारे हा प्रकल्प थांबवण्याच्या तयारीत नाहीत. ते आपल्या मतांवर आणि कृतीवर ठाम आहेत.