---Advertisement---

काळजाचा थरकाप उडवणारी घटना, अल्पवयीन मुलीने..

---Advertisement---

नागपूर : अल्पवयीन मुलीने युट्यूब व्हिडिओ पाहून स्वत: घरामध्येच स्वत:ची प्रसूती केल्याची घटना नागपूरमध्ये उघडीस आली आहे.  एव्हढंच नाही तर या मुलीने बाळाचा देखील जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या अल्पवयीन मुलगी रुग्णालयात असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

सूत्रानुसार, नागपूरातील अंबाझारी पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवारी ही घटना घडली आहे. सदर मुलगी ही इयत्ता ९ वी मध्ये शिकत होती. गेल्या वर्षी ठाकूर नामक युवकाशी तिची सोशल मीडियावर ओळख झाली. या मुलीच्या घरी ती आणि तिची आई अशा दोघीच मायलेकी राहतात. आई एका खासगी कंपनीत काम करते. आई घरी नसताना मुलीचे मित्राशी संबंध वाढले. तसेच ती त्याला भेटू लागली.

मुलीच्या घरी कोणी नसतं याचा फायदा घेत त्या तरुणाने तिला दारू पाजली. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. नंतर तरुणाने या मुलीवर अत्याचार केला. तिला शुद्ध आली तेव्हा आपल्याबरोबर चुकीचा प्रकार घडल्याचं तिच्या लक्षात आलं. मात्र तिने घरी या विषयी काहीच सांगितले नाही. मुलीने त्या युवकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाही. पुढे काही दिवसांनी ती गरोदर राहिली. आईला हे समजल्यावर ती आपल्याला ओरडेल या भीतीने मुलीने घरी काहीच सांगितले नाही.

पुढे काही दिवसांनी तिने युट्यूब व्हिडिओ पाहून सर्व माहिती मिळवण्यास सुरूवात केली. प्रसूती कशी होते? कशी केली जाते? अशी सर्व माहिती तिने मिळवली. तसेच यासाठी तिने लागणारे सामान जमा केले. शुक्रवारी दुपारी आई घरी नसताना तिच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे तिने युट्यूबवर व्हिडिओ सुरू करत प्रसूती केली आणि स्वत:ची सुटका केली. मात्र यात तिने बाळाचा देखील जीव घेतला. आई घरी आल्यावर तिला मुलीची प्रकृती ठिक नसल्याचे दिसले. तसेच घरात काही ठिकाणी रक्ताचे डागही होते. त्यामुळे आईने कसून चौकशी केली असता मुलीने या बाबत घरी सर्व सांगितले. आईने तिला जवळच्या शासकीय रुग्नालयात दाखल केलं आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment