चॉकलेटचे अमिष दाखवून सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

तरुण भारत लाईव्ह । ६ मार्च २०२३। बीडमधून एक धक्कायदायक प्रकार समोर आला आहे. एका ६० वर्षीय वृद्धाने सहा वर्षीय अल्पवयीन चमुरडीवर चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केला. या घटनेने बीड हादरला आहे. याप्रकरणी ६० वर्षीय वृद्धाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सूत्रानुसार, बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात ही घटना घडली आहे. पीडिता मैत्रीणीसोबत खेळत असताना आरोपीने ‘चल तुला चॉकलेट देतो’ असे आमिष दाखवून तिला घरात नेत अत्याचार केला. इतकंच नव्हे तर ‘कुणाला काही सांगितलं तर तुला सोडणार नाही’ अशी जीवे मारण्याची धमकी पीडितेला दिली. मुलगी शांत असल्याने आई वडिलांनी विचारपूस केली असता सगळा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी आई-वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसात ६० वर्षीय वृध्दाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. दरम्यान, देशभरात मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.