---Advertisement---

..अन् तरुणानं चक्क घरावरच उभारला शिवरायांचा पुतळा

---Advertisement---

नागपूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची १९३वी जयंती आज महाराष्ट्रभर साजरा होत असून शिवप्रेमीकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. नागपूरच्या एका तरुणानं तर चक्क आपल्या घरावरच शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा १४ फुटांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे.

अनिल देशमुख या तरुणानं आपल्या घरावरच शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. अनिल यांना लहानपणापासूनच छत्रपती शिवरायांचा इतिहास, व्यक्तीमत्व आणि विचारांविषयी प्रचंड आकर्षण आणि अभिमान होता. यातूनच घर बांधतांनाच शिवरायांचा पुतळा उभारण्याचा विचार त्याच्या मनात आला. सार्वजनिक ठिकाणच्या पुतळ्यांची होणारी आबाळही त्याने सातत्यानं पाहिलीय. त्याच्या या कृतीशील विचारांचा त्याचे शेजारी आणि मित्रांनाही अभिमान आहे.

तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने मार्गक्रमण करावे. सर्वांनी वाद विवाद न करता आपल्या घरावरच पुतळा बसवावा. तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने मार्गक्रमण करावे, असा संदेश पुतळा उभारून अनिल देशमुख यांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment