---Advertisement---

Video # इराकमध्ये विद्यापीठाच्या वसतिगृहाला भीषण आग! 14 विद्यार्थी ठार, 18 जखमी

---Advertisement---

इराकच्या उत्तरेकडील शहर इरबिल येथे विद्यापीठाच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत किमान 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या आगीत 18 जण जखमी देखील झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (8 डिसेंबर) सायंकाळी घडली. रॉयटर्सने याबद्दल वृत्त दिले आहे

सोरनच्या आरोग्य संचालनालयाचे प्रमुख कामराम मुल्ला मोहम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार, इरबिलच्या पूर्वेकडील सोरन या छोट्या शहरातील एका इमारतीत आग लागली. सरकारी माध्यमांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे.

इराकचे पंतप्रधान मसरूर बरजानी यांनी या वेदनादायक घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पीडित कुटुंबांप्रती मला सहानुभूती असल्याचे ते म्हणाले. आम्ही या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment