तरुण भारत लाईव्ह । बीड : कलेक्टर ऑफिसमधील कोणत्याही विभागामध्ये एकही एसी लावला जाणार नाही, असा अनोखा निर्णय बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी घेतला आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ऐन उन्हाळ्यात हा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे.
सरकारी गाडी, एसी केबिन आणि सरकारी यंत्रणेतील सर्व सुख-सुविधा उपभोगण्याचा अधिकार क्लास वन अधिकाऱ्याला मिळतात, अशी आपली सर्वांची धारणा आहे. यासाठी अनेक जण सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगतात. परंतु, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे याला अपवाद ठरल्या आहेत.