Ram Mandir : अयोध्येत Ayodhya 22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणेची Ram Mandir जोरदार तयारी सुरु आहे. संपूर्ण देशात उत्साहाचं आणि भक्तीमय वातावरण आहे. 22 जानेवारीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी सामाजिक सलोखा आणि बंधुभावाच्या भावना लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. पाच वर्षांच्या रामलल्लाची प्रतिमा कशी असेल? याची उत्कंठता लोकांच्या मनात निर्माण होत आहे. केवळ हिंदूच नाही तर सर्व जाती-धर्माची लोकं यापासून दूर नाहीत. ‘तिहेरी तलाक’ पीडित मुस्लीम महिलाही रामलल्लाच्या भेटीसाठी अयोध्येत दाखल होणार आहेत. इतकंच नाही तर स्वतःच्या हातांनी बनवलेली वस्त्र भेटही देणार आहेत.
रामलल्लाच्या वस्त्रांसाठी जोरदार तयारी
तिहेरी तलाक पीडित मुस्लीम महिला रामलल्लासाठी रत्नजडीत वस्त्र भेट देणार आहेत. ही वस्त्र संपूर्णपणे मोत्यांनी जडलेली असणार आहेत, यासाठी या महिलांनी देणगीचं आवाहनही केलं आहे. आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या महिला बरेली, बदायूं, रामपूर, मुरादाबाद, मेरठ, प्रयागराजसह 30 जिल्ह्यांमधून देणगी गोळा करत आहेत. रत्नजडीत वस्त्र बनवण्यासाठी खास कारागिरांवर कामगिरी सोपवण्यात आली आहे. याशिवाय देणगीतून जी रक्कम उरेल ती राम मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द केली जाणार आहे. हिंदू समाजाने आम्हाला ईदगाहसाठी जमीन दान केली, तर आम्ही राम मंदिराच्या उभारणीत सहकार्य का करू शकत नाही? अशी भावना या महिलांना व्यक्त केली आहे
26 जानेवारीनंतर दर्शन
या महिला 26 जानेवारीनंतर रामलल्लाच्या दर्शनसाठी अयोध्येत दाखल होणार आहेत. यावेळी त्या आपल्या हाताने रत्नजडीत वस्त्र भेट देणार आहेत. रामलल्लासाठी बनवण्यात येणारी ही रत्नजडीत वस्त्र बरेलीतल्या प्रसिद्ध कारागिरांकडून बनवली जात आहेत. ही वस्त्र आपल्या हाताने रामलल्लाला भेट देण्याची इच्छा या महिलांनी व्यक्त केली असून त्यांनी राम मंदिर ट्रस्टला विनंती केली आहे. या सर्व महिला ‘मेरा हक फाऊंडशेन’शी संबंधीत आहेत.
देशभरातील भाविकांना आमंत्रण
22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिषष्ठा केली जाणार आहे. यावेळी भव्य कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाटी देशभरातील लोकांना अक्षत कलशासोबत निमंत्रण पाठवलं जात आहे. अयोध्येबरोबर संपूर्ण देशात राममय वातारण झालं आहे. या दिवशी देशभरातील भाविक अयोध्येत दाखल होणार अससल्याने भारतीय रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये साठी अतरिक्त ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. देशातील प्रत्येक शहर रेल्वेद्वारे अयोध्येशी जोडण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न आहे.