लहान मुलांची आंबे खाण्याची अनोखी स्पर्धा, एका मिनीटात चार आंबे खाल्ले

Mango eating contest : बाजारात आता आंब्याचा सीजन सुरू झाला आहे. वर्षातून एकदाच येणारा हा फळ खाण्याचा आनंद प्रत्येकालाचा असतो. मात्र पुण्यात एक अनोखी स्पर्धा नुकतीच  पार पडली. या स्पर्धेची आता चर्चा सर्वत्र होत आहे.

काय स्पर्धा 
प्रल्हाद गवळी मित्रपरिवाराने रविवार पेठेतील संत नामदेव चौक येथे लहान मुलांची आंबे खाण्याची अनोखी स्पर्धाच आयोजित केली. एका मिनीटात चार आंबे खायचे होते.  यामध्ये  अनेक लहानग्यांनी स्पर्धेत भाग घेऊन आंबे खाण्याचा आनंद लुटला.  उन्हाळ्यात प्रत्येकालाच आंबे खाण्याचा आनंद असतो. तेच पाहून लहान मुलांची थेट आंबे खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.

आंबा फक्त चवीलाच नाही तर आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर
एका वेबच्या माहितीनुसार, आंब्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक घटक असतात. रक्त गोठणे, अॅनिमियाच्या समस्यांवर आंबा प्रभावी ठरतो. एवढेच नाही तर आपल्या शरीरातील हाडे मजबूत होण्यासही मदत होते. आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रक्तवाहिन्या आणि कोलेजनसाठीही फायदेशीर आहे. ज्यामुळे शरीरातील विविध समस्या लवकरात लवकर बऱ्या करणे सोपे होते.