वेध
– विजय कुळकर्णी
हिंदी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक Satish Kaushik यांच्या निधनाने हिंदी चित्रपट जगताने एक चतुरस्र कलाकार गमावला आहे.
Satish Kaushik सतीश कौशिक यांनी कागज, चॅलेंज, मुझे कुछ कहना है, मिस्टर इंडिया, रूप की रानी चोरो का राजा इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यापैकी मिस्टर इंडिया, रूप की रानी चोरो का राजा असे अनेक चित्रपट आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. हम आपके दिल मे रहते है, कागज, तेरे नाम या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी अनिल कपूर, सलमान खान, श्रीदेवी यांना चित्रपटात काम करण्याची संधी दिली होती. मि. इंडियापासून त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकीर्दीला सुरुवात झाली. Satish Kaushik ते उत्कृष्ट अभिनेते तर होतेच; शिवाय उत्कृष्ट दिग्दर्शक आणि निर्मातेदेखील होते. हास्य अभिनेता म्हणूनही त्यांनी रुपेरी पडदा गाजविला. पटकथा लेखक म्हणून त्यांनी काम केले. Satish Kaushik उत्कृष्ट हास्य अभिनेता म्हणून त्यांना मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
Satish Kaushik १९७८ मध्ये त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, १९७२ मध्ये किरोडिमल कॉलेज, फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून अभिनयाचे धडे गिरविले. अनेक नाटकातही त्यांनी भूमिका केल्या. अत्यंत लवचिक स्वभावाचे कौशिक आधुनिक तंत्रज्ञान आणि समाज माध्यमांवर सक्रिय होते. सध्या समाज माध्यमांची नेटक-यांमध्ये असलेली क्रेझ पाहता त्यांनी कर्मयुद्ध, ब्लडी ब्रदर्स, गिल्टी माईंड, स्कॅम १९९२, मे आय कम इन मॅडम इत्यादी वेबसिरीज तयार करून त्या यशस्वीदेखील केल्या. Satish Kaushik केकेबीकेकेजे, गन्स अॅन्ड गुलाब्स, इमर्जन्सी इत्यादी त्यांच्या येऊ घातलेल्या वेबसिरीज आहेत. रुपेरी पडद्यावर आपल्या उत्कृष्ट संवादफेक व अभिनयाने रसिकांना हसविणारा हा अभिनेता कायमचा काळाच्या पडद्याआड गेल्याने रसिकांना दु:खावेगात सोडून गेला. त्यांच्या जाण्याने रंगाचा बेरंग झाला. Satish Kaushik मि. इंडियातील ‘कॅलेन्डर’ आता पुन्हा आपल्याला पडद्यावर दिसणार नाही. ‘जाने भी दो यारो’मधील त्यांची Satish Kaushik अशोकची भूमिका सदैव स्मरणात राहील.
Satish Kaushik त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अत्यंत साधी राहणी, मनमिळावू स्वभाव यामुळे ते बॉलिवूडमधील सर्व कलाकारांचे ते आवडते होते. मानवी जीवन पाण्याचा बुडबुडा आहे. माहीत नाही कधी तो नाहीसा होईल. एक दिवशी आपल्या निधनाची हेडलाईन होईल. तेव्हा, सतत काम करत राहा. Satish Kaushik काम करत राहाल तेवढे दिवस तुम्ही जिवंत राहाल. ज्या दिवशी काम बंद कराल त्या दिवशी तुमचे जीवन संपेल, असे ते नेहमी म्हणायचे. ४० वर्षांच्या मैत्रीवर अशाप्रकारे अचानक पूर्णविराम लागेल याची कल्पना नव्हती, अशी शोकसंवेदना अभिनेते व त्यांचे परममित्र अनुपम खेर यांनी व्यक्त केली. Satish Kaushik चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ते शिस्त पालनावर अत्यंत भर देत. इतर वेळी मात्र सहकलाकारांसोबत हास्यविनोद करण्यात गुंग होत.
चित्रीकरणादरम्यान प्रत्येक कामातील बारकावे कलाकारांना सांगत. Satish Kaushik एवढेच नव्हे, तर सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांनादेखील ते कधी कधी सूचना देऊन एखाद्या नृत्यात कशा पद्धतीने अभिनयाद्वारे बारीकसारिक अदा प्रदर्शित करता येऊ शकतात हे सांगत. त्यावरून अभिनयाव्यतिरिक्त त्यांना नृत्य, संवाद, गायन, कथा, पटकथा लेखन याचेही ज्ञान होते. त्याचा वापर ते अभिनय व दिग्दर्शनवेळी खुबीने करीत. Satish Kaushik सर्व कामे हसतखेळत करीत असल्याने सहकलाकारांनाही त्यांच्या सोबत काम करणे आवडत होते. ४० वर्षांच्या मैत्रीवर अशाप्रकारे अचानक पूर्णविराम लागेल याची कल्पना नव्हती, अशी शोकसंवेदना अभिनेते व त्यांचे परममित्र अनुपम खेर यांनी व्यक्त केली. Satish Kaushik त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांना सद्गती प्रदान करो, हीच प्रार्थना!
८८०६००६१४९