---Advertisement---

“कुत्र्याला आवर घाला” सांगितल्याने विधवा महिलेस बेदम मारहाण; गुन्हा दाखल

---Advertisement---

पाचोरा : कुत्र्याला आवरण्याचे सांगितल्यावरून एका विधवा महिलेस बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील भडगाव रोडवरील पांडव नगरी भागात 14 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत तीन जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील पांडव नगरी भागातील रहिवासी जिजाबाई शाम अहेर यांनी पाळलेला कुत्रा फिर्यादी मनीषा रवींद्र वाघ (सुतार) या महिलेच्या भाचाच्या अंगावर आल्याने मुलाने आपला जीव वाचवत घरात पळ काढला.

यावेळी मनीषा वाघ हिने पाळीव कुत्र्याची मालकीण जिजाबाई हिस आपल्या कुत्र्याल्या आवर घाला असे बोलल्याचा राग आल्याने कुत्र्याची मालकीणसह त्यांच्या दोन्ही मुलींनी फिर्यादीस प्लास्टिक पाईपाने पाठीवर, हाथपायावर, मानेवर मारहाण करीत चाकूने मारून टाकेल अशी धमकी दिली. अशी फिर्याद मनीषा वाघ यांनी पाचोरा पोलिसात दिल्याने जिजाबाई शाम अहेर, गायत्री शाम अहेर,अश्विनी शाम अहेर (रा.पांडव नगरी,पाचोरा ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment