लक्ष द्या : रात्रीच्या वेळेस कुणीही शेतात जाऊ नका, हिंस्त्र प्राण्याने घातला धुमाकूळ

पारोळा : मोंढाळे व हिवरखेडे गावातील परिसरात बिबट्याने किंवा हिंस्त्र प्राण्याने धुमाकूळ घातला आहे. २३ ते २४ रोजी एक गाय व एक वासरी ठार केल्याची घटना उघडीस आली आहे. या घटनेनं गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान,  घटनास्थळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता बिबट नाहीतर तडस किंवा इतर हिंस्त्र प्राण्याचे ठसे आढळून आले असून त्याचे छायाचित्रण करून ते तज्ञांना पाठवणार असल्याचे सांगण्यात आले.

तालुक्यातील मोंढाळे प्र अ हिवरखेडे खू शिवारात २३ ते २४ रोजी सदर घटना उघडीस आली. घटनास्थळी वनविभागाचे प्रेमराज सोनवणे,  सविता पाटील, रामदास वेलसे यासह वनपाल, वनमजूर यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यामध्ये बिबट नाहीतर तडस किंवा इतर हिंस्त्र प्राण्याचे ठसे आढळून आले असून त्याचे छायाचित्रण करून ते तज्ञांना पाठवणार आहेत.

त्यानुसार ते बिबट किंवा तळस असल्याचे निष्पन्न होईल सदर हिवरखेडे गावातील विजय ताथु पाटील यांचे 23 रोजी एक बासरी तसेच गोरख यादव पाटील यांचे 24 रोजी सायंकाळी मोठी बासरी या हिंस्त्र प्राण्याने फस्त केली आहे तर आणखी एका गाईवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळेस कुणीही शेतात जाऊ नये व आपली गुर ढोर शेतातुन घरी घेऊन यावे असे आवाहन पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. देसले यांनी केले आहे.

संरक्षणाची व पीक रक्षणाची मागणी
शेतकरी सुधाकर पाटील यांनी लाईट रात्रीची येत असल्यामुळे शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागते. सदर शेत शिवारालगत फॉरेस्ट जंगल आहे. वन्य प्राण्यांचा हैदोष असून रानडुक्कर, हरिण, कोल्हे, लांडगे, राणघोडे, आदी प्राण्यांचा त्रास आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे, अशी मागणी केली आहे तसेच याबाबत संरक्षणाची व पीक रक्षणाची मागणी यावेळी केली. शिवाय मयत गाईचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी ही शेतकऱ्यांनी केली आहे.