---Advertisement---

वाद मिटवण्यासाठी बोलावले अन् केला गोळीबार, १२ जणांविरूध्द गुन्हा

---Advertisement---

---Advertisement---

धुळे : साक्रीत जुन्या वादातून अष्टाणे गावातील युवकाला वाद मिटवण्याच्या बहाण्याने बोलावून अचानक हल्ला करत गोळीबार केला. यावेळी एकाने प्रसंगावधान राखत गोळी झाडणाऱ्याचे हात वर केल्याने गोळ्या हवेत गेल्या आणि अनर्थ टळला. यात दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी शुभम चव्हाणसह सुमारे १२ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संदीप भटू देवरे (३२, रा. अष्टाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या नातेवाइकांवर गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाला आहे. याच वादातून महेश नथ्थू अहिरराव यास शुभम चव्हाण व साथीदारांनी मारहाण केली त्यानंतर शुभमने हर्षल देवरेला फोन करून वाद मिटवण्यासाठी भेटण्यास बोलावले.

संदीप देवरे मित्रांसह सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले असता, शुभम चव्हाण, रवींद्र सुळ (रा. विजापूर), संदीप गोयकर व त्यांचे ८ ते १० साथीदार आधीच तिथे उपस्थित होते. त्यांनी महेश अहिररावला पुन्हा मारहाण केली. महेशला सोडवण्यासाठी गेलेल्या संदीप देवरेला तिघांनी बेदम मारहाण केली.

यावेळी शुभमने बंदूकसदृश वस्तू काढत संदीपवर रोखला. मात्र, हर्षल देवरेने धाडसाने हस्तक्षेप करत त्याचा हात वर केल्याने दोन गोळ्या हवेत फायर झाल्या. गोळीबार झाल्यानंतर हल्लेखोर तिथून फरार झाले.

संदीप आणि महेश यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यानुसार, शुभम चव्हाण, रवींद्र सुळ, संदीप गोयकर या तिघांसह इतर ८ ते १० अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment