ट्रॅक्टरच्या धडकेत तरूण ठार, अमळनेर-पारोळा रस्त्यावरील घटना

#image_title

पारोळा | ट्रकच्या धडकेत ४ २ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अमळनेर-पारोळा रस्त्यावर घडली. गिरीधर इंदरलाल सिंधी (४२) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील गोंधळवाडा भागातील रहिवाशी गिरीधर इंदरलाल सिंधी (४२) हा तरूण अमळनेर येथे कामानिमित्त गेले असता तिकडून परतत असताना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने  जागीच मृत्यू झाल्याची घटना अमळनेर पारोळा रस्त्यावर जिनिंग जवळ रात्री ८  वाजेच्या सुमारास घडली.

 गिरीधर इंदरलाल लुल्ला (सिंधी) वय ४२  हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच १९ बी एच ६६३८ वर पारोळा जाण्यासाठी अमळनेरहून निघाले. सुमारे ८ वाजेच्या सुमारास एका विना नंबरच्या ट्रॅक्टरने समोरून जोरदार धडक दिल्याने ते मोटरसायकल सह खाली पडले.

त्यांच्या डोक्याला मार लागून ते रक्तबंबाळ झाले. कुणीतरी त्याच्या मोबाईल वरून त्यांचे नातेवाईक अमळनेर येथील व्यापारी रविकुमार वसंतकुमार माधवाणी रा सिंधी कॉलनी अमळनेर याना कळवले त्यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला रविकुमार यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात ट्रॅक्टर चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.