---Advertisement---

ऑनलाइन खेळात गमावले पैसे; आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणास वाचविले

---Advertisement---

जळगाव : ऑनलाइन खेळात पैसे हरल्यामुळे जीवाचे बरेवाईट करण्यासाठी घरातून न सांगता निघालेल्या तरुणास वरणगाव रेल्वे स्टेशनवर होमगार्ड गजानन चव्हाण आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवान अनिल जगताप यांनी त्याच्या आईवडिलांशी संपर्क करून त्यांच्या ताब्यात दिले आहे.

३ ऑगस्ट रोजी सकाळी पावणेतीनच्या सुमारास होमगार्ड गजानन चव्हाण हे रेल्वे स्टेशनवर रात्र पहारा करत असताना, वाशिम येथे राहणारा व अमरावती येथे शिक्षण घेत असलेला हा तरुण ऑनलाइन खेळात एक लाख रुपये हरल्यामुळे जीवाचे बरेवाईट करण्याच्या उद्देशाने अमरावतीहून रेल्वेत बसला होता. तो वरणगावला उतरल्यावर त्याची विचारपूस केली असता, त्याने त्याचे नाव मनिष मेश्राम (वाशिम) सांगून घडलेला प्रकार सांगितला.

त्यावेळी रेल्वे सुरक्षा बलाचे अनिल जगताप यांनी मोबाइलवर पाठविलेल्या फोटोशी मुलाचे वर्णन जुळल्याबरोबर चव्हाण यांनी रेल्वे आरपीएफ अनिल जगताप यांचेशी संपर्क साधून शहानिशा केली व त्याला त्यांचे ताब्यात देऊन मुलाच्या आईवडिलांशी बोलणे करवून दिले.

अशा प्रकारे या तरुणाला त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहे. त्याबद्दल होमगार्ड चव्हाण व आरपीएफ जगताप यांचे कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---