तलाक-हलालाची भीती, शिक्षिकेने स्विकारला सनातन धर्म

तलाक आणि हलालाच्या भीतीने एका खाजगी शिक्षिकाने आपला धर्म सोडून स्वतःच्या इच्छेने सनातन धर्म स्विकारल्याची बातमी समोर आली आहे. पण, महिलेचा हा निर्णय तिच्या कुटुंबीयांनी मान्य केलेला नाही. असे सांगितले जात आहे की, महिलेच्या कुटुंबीयांची तिच्या निर्णयाविरोधात लग्न करण्याची इच्छा होती. पण ज्या व्यक्तीशी लग्न करण्याची चर्चा होती त्या व्यक्तीचे वय जास्त होते. त्यामुळे महिलेने लग्न टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

या निर्णयानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी तिला धमक्या देण्यास सुरुवात केली. पीडित महिलेने एक व्हिडिओही बनवला ज्यामध्ये तिने बरेलीचे एसएसपी, डीएम आणि मुख्यमंत्र्यांना संरक्षणाची विनंती केली. खासगी शिक्षिका नेहा अस्मत यांनी सनातन धर्म स्वीकारला असून तिचे नाव बदलून नेहा सिंग असे ठेवले आहे.

वास्तविक, बरेलीच्या बारादरी येथे राहणाऱ्या नेहाने आपला धर्म बदलला. दरम्यान, तिच्या कुटुंबीयांनी संजयनगर येथील मोहितवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. नेहाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, डीएम आणि एसएसपी यांना पत्र पाठवून तिच्या जीवाला धोका असल्याचे आणि संरक्षणाची विनंती केली आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल  
नेहाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने सांगितले की तिचे वडील असगर अली बीज विकास महामंडळात अकाउंटंट होते, जे आता या जगात नाहीत. बरेली कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर ती बीएडचे शिक्षण घेत आहे.

नेहाने सांगितले की तिची बहीण, भावजय आणि तिच्या आईसह एक व्यक्ती तिच्यावर एका मध्यमवयीन पुरुषाशी लग्न करण्यासाठी दबाव आणत होते, ज्याने आपल्या पत्नीला तलाक दिल्यानंतर, हलाला केला होता. घरच्यांच्या या निर्णयामुळे नाराज होऊन तिने  हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.