---Advertisement---

दुर्दैवी! झिपलाईन करायला गेली अन् थेट 30 फूट उंचीवरून कोसळली, २८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

---Advertisement---

पुणे : झिपलाईन स्टंट करण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय तरुणीचा तब्बल 30 फूट उंचीवरून कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तरल अरुण अटपळकर (वय 28) असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे अटपळकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पुणे-सातारा महामार्गावर असलेल्या राजगड वॉटर पार्कमध्ये अटपळकर कुटुंबीय सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. दरम्यान, झिपलाईन स्टंट करताना तरल हिचा तोल जाऊन 30 फूट उंचीवरून खाली कोसळली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. या दुर्घटनेमुळे पार्कमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणी वॉटर पार्क चालक आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले अन् नको ते घडलं

उन्हाळ्याची सुट्टी असल्याने कुटुंबातील १२ सदस्य राजगड वॉटर पार्कमध्ये आनंद घेण्यासाठी गेले होते. प्रत्येकी १२०० रुपये प्रवेश शुल्क भरले. दिवसभर खेळ खेळले, जेवण केले आणि सायंकाळी झिपलाईन स्टंट करण्याचे ठरले. तरल उत्साहाने झिपलाईन करायला गेली, पण अचानक ती ३० फूट उंचीवरुन खाली कोसळल्याची माहिती तरलचे काका नंदकिशोर अटपळकर (वय 50) यांनी दिली.

पार्कमध्ये सुरक्षा उपाय पुरेसे नव्हते. तांत्रिक अडचणीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अपघात झाल्यास, लोकांना वाचवण्यासाठी जाळी नव्हती. तरलला जेव्हा रुग्णालयात नेले, तेव्हा ती बेशुद्ध होती. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आम्हाला हे स्वीकारणे खूप कठीण आहे. आम्ही अत्यंत दुःखात आहोत. तरलच्या आजी आणि आईला मोठा धक्का बसला आहे. आम्हाला न्याय हवा आहे, पैशांची भरपाई नको, अशी मागणीही तरलचे काका नंदकिशोर अटपळकर (वय 50) यांनी केली आहे.

दरम्यान, यापूर्वीदेखील एका तरुणीचा पॅराग्लायडिंग करताना मृत्यू झाला होता. तसेच २७ वर्षीय शिवानी दाबले आणि २६ वर्षीय नेपाळी पायलट सुमन नेपाळी या दोघांचा मृत्यू झाला होता. १८ जानेवारी रोजी परनेम केरी येथील क्री पठार परिसरात पॅराग्लायडिंग करण्यासाठी गेली होती. तिथेच शिवानीच्या पॅराशुटचा दोर तुटला. शिवानीचे पॅराशमुट थेट एका दगडावर कोसळले. यात शिवानीसह तिच्यासोबत असलेला पायलट सुमन नेपाळी यांचा मृत्यू झाला होता.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment