raj thackrey : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पाडवा मेळावा नुकताच पार पडला. मेळाव्यात राज ठाकरेंनी अनधिकृत मशिदी, दर्गांच्या बांधकामाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी माहिमच्या समुद्रात अनधिकृत बांधकाम प्रश्न उपस्थित करत महापालिका आयुक्तांना यांनी महिन्याभरात त्यावर कारवाई केली नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठे गणपती मंदिर उभे करू, असा इशाराही दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने कारवाई करत हे बांधकाम तात्काळ हटवले. राज ठाकरेंच्या या भाषणाने प्रभावी झालेल्या गुजरातमधील एका तरुणाने राज ठाकरे यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
काय मदत मागितलीय?
लिंकन सोखडिया नावाच्या तरुणाचे एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे. तरुणाने ट्विट करत राज ठाकरेंना मदतीचे आवाहन केले आहे. “अहमदाबाद’चा प्रसिद्ध चांडोळा तलाव आता नामशेष झाला आहे. इथला निम्मा तलाव बेकायदेशीरपणे बाहेरून आलेल्या मुस्लिमांनी पचवला आहे. हे संपूर्ण गुजरातला माहीत आहे,” असे या तरुणाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या ट्विटमध्ये तो पुढे म्हणतो की, “येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालतात आणि अनेक गुन्हेगार लपून बसले आहेत. इथे एक नाही तर अनेक मशिदी आणि मदरसे बांधण्यात आले आहेत. आत्तापर्यंत गुजरातच्या एकाही नेत्याने तिरडी पाहिली नाही किंवा याबाबत आवाज उठवला नाही. निदान एक द्विट तरी करा म्हणजे इथे राहणाऱ्या आमच्यासारख्या अज्ञानी हिंदूंचे भविष्य वाचेल.”