आलू चाट पदार्थ ट्राय केला आहे का?, घरी नक्की ट्राय करा

तरुण भारत लाईव्ह ।०२ फेब्रुवारी २०२३। चाट हे प्रत्येकालाच आवडत पाणीपुरी, भेळ, असे पदार्थ आपण नेहमी खातो. पण तुम्ही कधी आलू चाट हा पदार्थ ट्राय केला आहे का? नसेल केला तर डोन्ट वरी आलू चाट हा तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता यासाठी काय साहित्य लागते आणि हे घरी कसे बनवले जाते हे जाणून घ्या तरुण भारताच्या माध्यमातून.

साहित्य
बटाटे, दही, जिरे, चिंच-खजूर व गुळाची आंबट-गोड चटणी, बारीक शेव,चाट मसाला,कोथिंबीर.

कृती
सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या आणि सालं काढून बटाटे चिरून छोट्या छोट्या फोडी करा. चिंच-खजूर व गुळाची आंबट-गोड चटणी करून ठेवा. तेल गरम करून बटाट्याच्या फोडी ब्राउन होइपर्यंत तळा.परतलेल्या बटाट्याच्या फोडी एका भांड्यामधे काढून त्यावर मीठ घाला. सर्व्हिंग डिशेसमध्ये प्रत्येकी ४-५ चपट्या पुर्‍या घालून त्यावर बाउलमधल्या बटाट्यांच्या छोट्या फोडी घाला.नंतर त्या पुरीवर दही, चिंच-खजूर व गुळाची आंबट-गोड चटणी,बारीक शेव, चाट मसाला, कोथिंबीर घालून सर्व्ह करा आलू चाट.