---Advertisement---
धुळे : भारताने चंद्रावर पाठवलेलं चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यासाठी फक्त काही तासांचाच अवधी शिल्लक आहे. आज २३ ऑगस्ट रोजी हे यान सायंकाळच्या सुमारास चंद्राच्या पृष्ठावर उतरणार असून इस्रोच्या या मोहिमेवर भारतासह जगभरातील शास्त्रज्ञांचं लक्ष लागून आहे. चंद्रयान -3 चं यशस्वी लँडिंग व्हावी यासाठी धुळ्यात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने खानदेश कुलस्वामिनी एकवीरा देवीची महाआरती करण्यात आली.
चंद्रयान -3 यशस्वी लँडिंग व्हावी कुठल्याही प्रकारच विघ्न येऊ नये व तांत्रिक बिघाड होऊ नये यासाठी धुळे जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सतीश महाले यांच्या नेतृत्वात खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मातेची महाआरती करण्यात आली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मराठा संख्येने उपस्थित होते भारत माता की जय घोषणा देखील देण्यात आल्या.
अभाविपचे साकडे
चांद्रयान-३ ची मोहिम यशस्वी होण्यासाठी देशभरातील नागरिक प्रार्थना करत आहे. चांद्रयान सुरक्षितपणे चंद्रावर उतरावं आणि मोहीम यशस्वी व्हावी यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शंभू महादेवला साकडं घातले.
भारताचा तिरंगा आज चंद्रावर कोरला जाणार : दा. कृ. सोमण
चांद्रयान २ ही आपली मोहीम अपयशी ठरली. त्यानंतर आता इस्रोच्या वैज्ञानिकांनी ही काळजी घेतली की या विक्रम लँडवरच्या सेन्सर्सनी काम केलं नाही तरीही सुखरुपपणे उतरणार आहे. यावर चार मोटर्स आहेत. त्यातल्या दोन सुरु झाल्या तरीही सॉफ्ट लँडिंग होईल. हे सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर यावर चार उपकरणं आहेत. जी उपकरणं आपलं काम सुरु करतात. विक्रम लँडरमधून एक रोव्हर बाहेर पडणार आहे. त्यानंतर हा रोव्हर चंद्रावर एका सेकंदाला एक सेंटीमीटर या गतीने फिरणा आहे. वाटेत उंच सखल प्रदेश आला तरीही तो काम करणार आहे. या रोव्हरची जी सहा चाकं आहेत त्यावर इस्रोचं बोधचिन्ह कोरलेलं आहे ही माहिती सोमण यांनी दिली.









