पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कारानिमित्त पुणे दौऱ्यावर असून, त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट दिली. गणपती बाप्पासमोर नतमस्तक होत पंतप्रधान पंतप्रधान मोदी यांनी अभिषेक, पूजन आणि महाआरती केली. त्यानंतर पंतप्रधानांचा ताफा एसपी कॉलेजकडे रवाना झाला आहे.
टिळक स्मारक ट्रस्टकडून यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात नरेंद्र मोदींसह शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यात शरद पवार यांच्या उपस्थितीवरून ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान दगडूशेठ मंदिर परिसरात आगमन झाल्यावर पुणेकरांचा नरेंद्र मोदींच्या नावाचा जयघोष करण्यात आला. “भारत माता की जय! मोदी मोदी…”अशा घोषणाही देण्यात आल्या.
पुणे विमानतळावर उतरल्यानंतर ते कृषी महाविद्यालायकडे रवाना झाले. या ठिकाणी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा ताफा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे रवाना झाले.