---Advertisement---
जळगाव : विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करून गर्भवती केल्याचा प्रकार जळगाव शहरात समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
---Advertisement---

जळगाव शहरातील एका भागात २६ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. विवाहित महिलेचे कौटुंबिक कारणावरून पतीसोबत नेहमी भांडण होत असते. याचा गैर फायदा घेत तुषार राजेंद्र अहिरे (२८) याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला.
या अत्याचारातून विवाहिता गर्भवती झाली. त्यानंतर तुषार राजेंद्र अहिरे (२८) याने विवाहितेसोबत लग्न करण्यास नकार दिला. या प्रकारानंतर पीडितेने शनीपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तुषार राजेंद्र अहिरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास डीवायएसपी संदीप गावीत हे करीत आहे.