जळगाव : येथील मुळजी जेठा महाविद्यालयात पेपरफुटी प्रकरणी चौकशी व्हावी, अशी मागणी अभाविपने निवेदनाद्वारे केली होती. मात्र महाविद्यालय प्रशासनाने याप्रकरणाकडे गांभीर्य न घेतल्याने आज बुधवारी अभाविपतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या मागण्यांकडे महाविद्यालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अभाविपचे महानगर मंत्री नितेश चौधरी यांनी दिला.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी देखील अभाविपतर्फे दोन वेळेस निवेदन देण्यात आले होते. मात्र, या विषयाकडे महाविद्यालय प्रशासनाचे दुर्लक्ष केल्याने आज बुधवारी ठिय्या आंदोलन करावे लागले असल्याचे अभाविपचे महानगर मंत्री नितेश चौधरी यांनी सांगितले.
काय म्हटलंय अभाविपने?
मूळजी जेठा महाविद्यालयात प्रथम सत्राच्या परीक्षा पार पडल्यात. या परीक्षांमध्ये तृतीय वर्ष संगणक शास्त्रच्या गणित विषयाचे प्रश्न परीक्षा अगोदर विद्यार्थ्यांपर्यंत आले होते. हे सर्व प्रकरण विद्यार्थी प्रतिनिधी यांनी महाविद्यालय परीक्षा संचालक यांनी सांगितले. हे सर्व प्रकरण होऊन एक महिना झाला परंतु, त्यावर महाविद्यालय प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. परीक्षा अगोदर विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न कोण पोहचवत आहे? या सर्व प्रकरणाची महाविद्यालय स्तरावर कमिटी गठीत करून त्याची चौकशी व्हावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे,
यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे प्राचार्यांना याबाबत दोन वेळेस निवेदन देण्यात आले होते.
मात्र, महाविद्यालय प्रशासनाणे या प्रकरणाकडे गांभीर्य न घेतल्याने आज बुधवारी विद्यार्थ्यांसह अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक होऊन प्राचार्य यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, या मागण्यांकडे महाविद्यालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे महानगर मंत्री नितेश चौधरी यांनी यावेळी सांगितले.
पहा व्हिडिओ :
https://fb.watch/i_RD98W4Bm/?mibextid=RUbZ1f