---Advertisement---

विधानसभेतील प्रश्नासाठी कोटींचा व्यवहार? 20लाखांची लाच घेतांना आमदाराला एसीबीकडून अटक

---Advertisement---

MLA bribe case: खाणकाम करणाऱ्या कंपनीला सतत त्रास देत कंपनीकडून १० कोटी रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणात २० लाख रुपयांची लाच स्वीकारतांना विधानसभा आमदाराला एसीबीकडून अटक करण्यात आलीये. जय कृष्ण पटेल असं अटक केलेल्या आमदारच नाव आहे. पटेल हे राजस्थानमधील बांसवाडा येथील भारत आदिवासी पक्षाचे आमदार आहेत.

एसीबीचे महासंचालक डॉक्टर रवि प्रकाश मेहरडा यांनी सांगितलं की, खाणकाम व्यावसायिक रविंद्र सिंह यांनी ४ एप्रिलला तक्रार दिली होती की, आमदाराने खाणीशी संबंधित प्रश्न विधानसभेत उपस्थित केले. त्यानंतर ते हटवण्यासाठी १० कोटींची मागणी केली. शेवटी तडजोड करून अडीच कोटी घेण्यास आमदार तयार झाले.

रविंद्र सिंह यांनी येथील आमदार जय कृष्ण पटेल यानं पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये रोख दिले. त्यानंतर एसीबीने पाळत ठेवण्यास सुरुवात केली आणि पुरावे गोळा केले. २० लाख रुपयांचा पुढचा हप्ता जयपूर येथील आमदार निवासस्थानी देण्यात येणार होता. सापळ्याच्या दिवशी, आमदार स्वतः जयपूरला पोहोचले आणि त्यांनी रंगीत नोटांनी भरलेली बॅग स्वीकारली आणि नंतर त्यांच्या बोटांवरही तोच रंग आढळला.

तांत्रिक पुराव्यांसह, एसीबीने दावा केला की नोटांवर विशेष शाई लावण्यात आली होती. ऑडिओ, व्हिडिओ आणि छायाचित्रे घेण्यात आली. बॅग उचलताना आमदाराच्या बोटांवर शाई आढळली. आमदाराच्या वतीने पैसे घेणारी व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाली आहे. एसीबीचा दावा आहे की त्यांच्याकडे या व्यक्तीचे रेकॉर्डिंग आहे, ज्यामध्ये तो पैसे घेताना दिसत आहे. या प्रकरणाबद्दल आमदाराची चौकशी केली जात आहे. एसीबीचे म्हणणे आहे की या प्रकरणात आणखी लोकांचा सहभाग समोर येऊ शकतो.

कोण आहेत जयकृष्ण पटेल ?

जयकृष्ण पटेल हे बांसवाडाच्या आनंदपुरी तहसीलमधील कनेला गावचे रहिवासी आहेत. पटेल त्यांच्या महाविद्यालयीन काळापासून राजकारणात सक्रिय आहेत. जयकृष्ण पटेल यांनी २०२३ मध्ये विधानसभा निवडणूकही लढवली होती, जिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

जयकृष्ण पटेल यांनी पोटनिवडणुकीत भारत आदिवासी पक्ष कडून निवडणूक जिंकली. या निवडणुकीत त्यांना १,२२,५७३ मते मिळाली तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुभाष तांबोलिया यांना ७१,१३९ मते मिळाली. येथे पटेल यांनी ५० हजारांहून अधिक मतांनी निवडणूक जिंकली होती.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment