---Advertisement---

Rajan Salvi : आमदार राजन साळवींच्या घरी एसीबीची धाड, गुन्हा दाखल

---Advertisement---

Rajan Salvi :  ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरी येथील निवासस्थानी एसीबीने धाड टाकली आहे. राजन साळवी यांच्याकडे त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आरोपपत्रात त्यांच्या पत्नी, मुलगा यांच्या नावाचा देखील नावाचा समावेश आहे. त्यामुळे साळवी अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

 

साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने आता पुढील कोणती कारवाई होईल याकडे लक्ष असणार आहे. आज सकाळी एसीबीच्या टीमने राजन साळवी यांच्या घरावर धाड टाकली होती. दोन तासांपासून त्यांच्या घराची झाडाझडती सुरु आहे. अनेक अधिकारी त्यांच्या घरी चौकशीसाठी आले आहेत. साळवी यांच्या संपत्तीची माहिती अधिकारी घेत आहेत. दुसरीकडे, राजन साळवी यांचे समर्थक त्यांच्या घराजवळ जमा झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment