Crime News : पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपीने पलायन केल्याचे अनेक ठिकणी समोर आले आहेत. अशीच एक घटना भुसावळात घडलीय. अल्पवयीन तरुणीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणातील अटक संशयीताने चक्क 50 फूट उंच पुलावरून उडी घेत पलायन केले. त्यानंतर संशयित पुढे व पोलीस मागे असा सिनेस्टाईल प्रकार घडला. मात्र, संशयिताचा पाय फ्रॅक्चर, मानेला दुखापत झाली. या प्रकारानंतर त्याला ताब्यात घेवून पुन्हा ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आले. रात्री उशिरा संशयिताविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास सुभाष गॅरेजजवळील रेल्वे पुलाजवळ घडली.
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील 16 वर्ष पाच महिन्यांच्या अल्पवयीन मुलीला संशयित पंकज ठाकूर यांनी रविवार, 16 एप्रिल रोजी मध्यरात्री फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर भुसावळ तालुका पोलिसात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. संशयितांचा शोध सुरू असताना ते नाशिकमध्ये आल्याची माहिती भुसावळ तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर मंगळवारी नाशिक येथे धाव घेत पथकाने दोघांना ताब्यात घेत भुसावळात आणले. त्यानंतर अल्पवयीन तरुणीला वैद्यकीय चाचणीसाठी जळगाव येथे नेण्यात आले होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. तर यास भुसावळ ट्रामा सेंटरमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास आणले होते.
चाचणी झाल्यानंतर संशयिताला सरकारी वाहनातून तालुका पोलीस ठाण्याकडे आणत असताना संशयिताने पोलीस वाहनातून उडी घेत पलायन केले. अचानक झालेल्या प्रकारानंतर पोलीस कर्मचारी भांबावले व त्यांनी संशयीताचा पाठलाग सुरू केला व तरुणाने 50 फूट उंच पुलावरून घेत पलायन केले. त्यानंतर संशयित पुढे व पोलीस मागे असा सिनेस्टाईल प्रकार घडला. मात्र, संशयिताचा पाय फ्रॅक्चर, मानेला दुखापत झाली. या प्रकारानंतर त्याला ताब्यात घेवून पुन्हा ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आले. रात्री उशिरा त्यास जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिसात रात्री उशिरा सहा.निरीक्षक अमोल पवार यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.