---Advertisement---
चाळीसगाव : शहरातील शाळा, महाविद्यालय व खाजगी क्लासेसच्या परिसरात घिरट्या घालणाऱ्या टवाळखोरांवर आज बुधवारी पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, ही कारवाई नियमितपणे सूरू रहावी, अशी मागणी पालकांकडून केली जात असून, या कारवाईचे कौतूक होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून चाळीसगावात शाळा, महाविद्यालय व खाजगी क्लासेसच्या परिसरात टवाळखोरांची गर्दी दिसून येत आहे. परिणामी विद्यार्थिनींना छेडछाडी, अशोभनीय भाषा व गैरवर्तनासारख्या घटना घडण्याची शक्यता असल्याने पालकांमधून चिंता व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक महेश्वर रेडडी, अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाने चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ, पोलिस उपनिरीक्षक श्री. सायकर, पोलिस अंमलदार शशिकांत महाजन, कल्पेश पगारे, पवन पाटील व अनिता सुरवाडे आदींनीकडून दामिनी पथकाद्वारे शाळा, महाविद्यालय व क्लासेसच्या परिसरात गस्त सुरू केली आहे.
नियमित कारवाईची मागणी
त्यानुसार आज बुधवारी सदर परिसरात गस्तीदरम्यान संशयीतरित्या फिरणाऱ्या दोन टवाळखोरांवर करावाई करण्यात आली. दरम्यान, दामिनी पथकाकडून होणारी ही कारवाई नियमितपणे सूरू रहावी, अशी मागणी पालकांकडून केली जात असून, या कारवाईचे कौतूक होत आहे.