Activa स्कूटरचे लिमिटेड व्हर्जन लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

तरुण भारत लाईव्ह । २९ सप्टेंबर २०२३। होंडा या दुचाकी कंपनीने ग्राहकांसाठी Activa स्कूटरचे लिमिटेड व्हर्जन लाँच केले असून या मध्ये दोन रंगांचे पर्याय उपलब्ध असतील.  नवीन Activa साठी बुकिंग सुरू आहे. होंडा activa ची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

ही स्कूटर डार्क कलर थीम आणि ब्लॅक क्रोमसह लाँच झाली आहे. त्याच्या बॉडीवरील स्ट्रिप ग्राफिक्समुळे ते अप्रतिम दिसते. Activa चे 3D सिम्बॉल देखील पाहता येईल. स्कूटरच्या जवळपास प्रत्येक भागात डार्क थीम दिसेल. नवीन अ‍ॅक्टिव्हा स्कूटरला पॉवर देण्यासाठी 109.51cc सिंगल सिलेंडर इंजिन वापरण्यात आले आहे. याच्या मदतीने 7.74 bhp ची कमाल पॉवर आणि 9.90 Nm चा पीक टॉर्क जनरेट होऊ शकतो. Activa ची एक्स-शोरूम किंमत ८०.७३४  रुपयांपासून सुरू होते.

Activa मध्ये दोन रंगांचे पर्याय असतील. तुम्ही मॅट स्टील ब्लॅक मेटॅलिक आणि पर्ल सेरेन ब्लू कलर. याशिवाय नवीन स्कूटरमध्ये अलॉय व्हील आले आहेत. त्याचा टॉप व्हेरिएंट होंडाच्या स्मार्ट की तंत्रज्ञानासह उपलब्ध असेल. अ‍ॅडव्हान्स फीचर्स या स्कूटरला खास बनवतात. तुम्हाला जर नवीन गाडी घ्यायची असेल तर हि गाडी उत्तम पर्याय असू शकते.