हैदराबाद : दक्षिण भारतातील ज्येष्ठ अभिनेत्री जमुना यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी शुक्रवारी सकाळी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. जमुना यांचा जन्म 30 ऑगस्ट 1936 रोजी कर्नाटकातील हम्पी येथे झाला होता. जमुना यांचे खरे नाव जनाबाई असे होते. त्यांनी 1953 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी गरिकापरी राजा राव दिग्दर्शित ‘पुट्टीलू’ मधून अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली होती.
ज्येष्ठ तेलुगू चित्रपट अभिनेत्री जमुना यांचे वयाशी संबंधित समस्यांमुळे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. एनटीआर आणि अक्किनेनी नागेश्वर राव यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे.