नवी दिल्ली । सध्या देशभरात लोकसभा निवडणूकीचं वार वाहत आहे. अनेक अभिनेते , अभिनेत्री सध्या राजकारणात प्रवेश करताना दिसत आहेत. यातच आता लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीने राजकारणात एंट्री मारली आहे. तिने आज पक्षनेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये रूपाली गांगुलीने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. दिल्लीमध्ये पक्षाच्या मुख्य कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला आहे.
रुपाली ही सध्या अनुपमा या मालिकेत काम करत आहे. स्टार प्लसवरील ही मालिका सध्या खूप चर्चेमध्ये आहे. पक्षप्रवेश झाल्यानंतर अभिनेत्री रुपाली गांगुलीने माध्यमांशी बोलताना भावना व्यक्त केल्या आहेत.
नरेंद्र मोदी यांची मी मोठी चाहती आहे. विकासाचं पर्व पाहिल्यावर मलाही यात सहभागी असलं पाहिजे, असं वाटतं. मोदींनी दिलेल्या मंत्रानुसार मी काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया रूपाली गांगुलीने व्यक्त केली आहे. सध्या रूपालीची अनुपमा भूमिका फार चर्चेत आहे. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद तिला मिळत आहे.