अधिसभा निवडणूक : विद्यापीठ विकास मंच उमेदवारांचा प्रचार सुरु

तरुण भारत लाईव्ह ।२१ जानेवारी २०२३। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 29 जानेवारी रोजी होणार्‍या अधिसभा निवडणुकीसाठी अभाविप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचने 10 जागांसाठी 10 उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी जुने जळगावातील श्रीराम मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ वाढवून करण्यात आला.
विद्यापीठ विकास मंचच्या पॅनलमध्ये अनुसूचित जाती  प्रवर्गातून दिनेश उत्तम खरात -अक्कलकुवा, जि. नंदुरबार, भटक्या जाती  प्रवर्गातून दिनेश दलपत चव्हाण- मुक्ताईनगर, जि. जळगाव, अनुसूचित जमाती प्रवर्गातून नितीन लीलाधर ठाकूर- धुळे, इतर मागास  प्रवर्गातून नितीन छगन झाल्टे- जामनेर, जि. जळगाव, महिला प्रवर्गातून महाजन स्वप्नाली तुळशीराम जळगाव, खुल्या प्रवर्गातून 5 उमेदवार निवडून द्यायचे आहेत.

खुला  प्रवर्गातून अमोल साहेबराव मराठे शिंदखेडा, जि. धुळे, अमोल नाना पाटील, भडगाव जि. जळगाव, नीलेश रमणराव झोपे जळगाव, सुनील राजधर निकम, चाळीसगाव व सोनवणे अमोल मुरलीधर शिरपूर, जि. धुळे यांचा समावेश आहे.
विद्यापीठ विकास मंचच्या 10 उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करीत प्रत्यक्ष मतदारांची भेट घेण्यात आली. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, उमेदवार नीलेश झोपे, स्वप्नाली महाजन-काळे, कबचौउमविचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, सिनेट सदस्या नेहा जोशी, माजी सिनेट सदस्या मनीषा खडके, माजी महापौर सीमा भोळे, माजी नगराध्यक्ष बंडू काळे, नगरसेवक सुनील खडके, कैलास सोनवणे, पिंटू काळे, अमित काळे, अ‍ॅड.शुचिता हाडा, गायत्री राणे, भाजयुमोच्या भैरवी वाघ-पलांडे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सागर येवले, अतुल हाडा, विक्रांत पाटील, डॉ. विरेन खडके, धनंजय खडके यांच्यासह अभाविप, विविमंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलीप पाटील यांनी गत 22 वर्षात विद्यापीठ विकास मंचच्या माध्यमातून कार्य करण्यात आलेल्या कार्याचा लेखा-जोखा मांडत पदवीधर मतदार हाच विद्यापीठ विकास मंचच्या कार्याचा आधार असल्याचे सांगितले.

विद्यापीठ विकास मंचचे सर्व उमेदवार विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यापीठ हित लक्षात घेऊन अहोरात्र काम करणारे व विविध क्षेत्रातील उच्च विद्याविभूषित व समाजभिमुख काम करणारे कार्यकर्ते असून यांचे विद्यापीठ विकासामध्ये भरीव योगदान राहिल याची ग्वाही निवडणूक प्रमुख व माजी व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील यांनी दिली असून अधिकृत पॅनल जाहीर करीत असल्याची घोषणा करत सर्व उमेदवारांना पसंतीक्रमानुसार विजयी करण्याचे आवाहन केले आहे.