तरुण भारत लाईव्ह । २७ ऑगस्ट २०२३। चंद्रमोहिमेच्या यशानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रो सूर्यमोहिमेची जोरदार तयारी करीत आहे. यासाठी विकसित करण्यात आलेल्या आदित्य-एल 1 चे येत्या 2 सप्टेबर रोजी प्रक्षेपण करण्याची शक्यता आहे. हे अंतराळ यान सौर कोरोनाचे सूर्याच्या बाहेरचे स्तर दूरून निरीक्षण तसेच एल-1 वर सौर हवेच्या निरीक्षणासाठी तयार करण्यात आले आहे. एल-1 हे ठिकाण पृथ्वीपासून जवळपास 15 लाख किमी अंतरावर आहे.
ही मोहीम केवळ सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. आदित्य- एल 1 च्या चारही बाजूंच्या कक्षांमधून सूर्याचा अभ्यास केला जाणार आहे. हे अंतराळ यान सात पेलोड्स घेऊन जाणार आहे. जे वेगवेगळ्या तरंगलहरींतून फोटोस्फेयर (प्रकाशमंडळ) आणि क्रोमोस्फेयर (सूर्याच्या दर्शनी पृष्ठभागाच्या वरचा भाग) आणि सूर्याची बाहेरच्या पातळीची वेगवेगळी निरीक्षणे केली जाणार आहेत.
आदित्य-एल 1या मोहिमेत पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. बंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स ही संस्था व्हिजिबल एमिशन लाईन कोरोनाग्राफ पेलोड तयार करीत आहे. पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स मोहिमेसाठी सोलर अल्ट्राव्हॉयलेट इमेजर विकसित करीत आहे. अल्ट्राव्हॉयलेट पेलोडचा वापर करून आदित्य-एल1 कोरोना आणि सौर क्रोमोस्फियरचा अभ्यास करेल तसेच एक्स-रे पेलोडचा वापर करून फ्लेयर्सवर नजर ठेवेल आणि त्याबाबतची माहिती घेईल.
बंगळुरूतील यू. आर. राव उपग‘ह केंद्रात हे अंतराळ यान तयार करण्यात आले आहे आणि दोन आठवड्यांपूर्वी ते आंध‘प्रदेशातील श्रीहरीकोटा येथे असलेल्या इस्रोच्या अंतराळ केंद्रावर पोहोचवण्यात आले, अशी माहिती इस्रोच्या अधिकार्यने दिली. आदित्य-एल1 चे प्रक्षेपण 2 सप्टेंबर रोजी केले जाणार आहे. एल-1 बिंदू च्या जवळपास बाहेरच्या कक्षेत उपग‘ह ठेवल्यास कोणत्याही ग‘हणाचा अडथळा येत नाही, असे इस्रोच्या अधिकार्याने सांगितले.