---Advertisement---

आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना खुले आव्हान, वाचा काय म्हणाले

---Advertisement---

मुंबई : शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यांचे वाक्युध्द दररोज सुरुच असते. दोन्ही बाजूकडील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. मी माझ्या मतदारसंघातून राजीमाना देतो. माझ्याविरोधात निवडणूक लढवा. तुम्ही कसे निवडून येतात ते मी बघतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ते एका जाहीर सभेत बोलत होते.

मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलेलं आहे. मी वरळीतून राजीनामा देतो. तुम्ही माझ्याविरोधात वरळीतून उभे राहा. तुम्ही कसे निवडून येता ते मी बघतो. जी यंत्रणा लावायची आहे ती लावा. जी ताकद लावायची आहे ती लावा. जेवढे खोके वाटायचे आहेत तेवढे वाटा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले. तसेच एकही मत विकले जाणार नाही. मी त्यांना पाडणारच, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment