---Advertisement---

Champions Trophy 2025 : अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी मोठी संधी!

---Advertisement---

पाकिस्तानमध्ये होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत अफगाणिस्तान संघासमोर ऐतिहासिक कामगिरी करण्याची मोठी संधी आहे. सध्या ब गटातील समीकरणे अत्यंत गुंतागुंतीची बनली आहेत. पावसामुळे साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामने रद्द झाल्याने अफगाणिस्तान संघांना फायदा, तर काही संघासाठी ‘करा वा मरो’ परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत अफगाणिस्तान संघाकडे उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी असून, त्यासाठी त्यांना आपले आगामी सामने जिंकावे लागतील.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळाला. या गटात आफ्रिका संघ 2.140 च्या चांगल्या नेट रन रेट सह पहिल्या स्थानी आहे, तर 0.475 नेट रन रेटसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांना अद्याप एकही गुण मिळालेला नाही, कारण त्यांनी आपले पहिले सामने गमावले आहेत. त्यामुळे पुढील सामने या चारही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

ऑस्ट्रेलियाचा शेवटचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध आहे. हा सामना जिंकला, तर त्यांचे 5 गुण होतील आणि ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. आफ्रिकेचा शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध आहे. हा सामना आफ्रिकेसाठी ‘करा किंवा मरो’ ठरणार आहे. विजय मिळाल्यास त्यांचेही 5 गुण होतील आणि ते उपांत्य फेरीत पोहोचतील.
जर ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका दोन्ही संघ जिंकले, तर इंग्लंड आणि अफगाणिस्तान स्पर्धेबाहेर जातील.

इंग्लंडला अजून दोन सामने खेळायचे आहेत. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. दोन्ही सामने जिंकल्यास ते उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. अफगाणिस्तान संघालाही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामने खेळायचे आहेत. जर अफगाणिस्तान संघाने हे दोन्ही सामने जिंकले, तर त्यांचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित होईल.

अफगाणिस्तान हा एक ‘अंडरडॉग’ संघ मानला जात असला, तरी त्यांनी भूतकाळात मोठ्या संघांना धूळ चारली आहे. 2023 वनडे विश्वचषकात त्यांनी इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेवर विजय मिळवला होता. विशेषतः इंग्लंडविरुद्ध त्यांच्या दमदार विजयाने क्रिकेटविश्वाला आश्चर्यचकित केले होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धदेखील त्यांची लढत थरारक ठरली होती. ग्लेन मॅक्सवेलच्या ऐतिहासिक 201 धावांमुळे ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला, पण एकवेळ अफगाणिस्तान संघ जिंकण्याच्या उंबरठ्यावर होता. याशिवाय, T20 क्रिकेटमध्येही त्यांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे, त्यामुळे मोठ्या संघांना हरवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे.

जर अफगाणिस्तान संघाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला, तर ते प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचतील. त्यांच्या संघाकडे अनुभवी खेळाडू आणि यंग टॅलेंटची उत्तम सांगड आहे. त्यामुळे हे दोन्ही सामने जिंकण्याची क्षमता अफगाणिस्तान संघात नक्कीच आहे.

आता संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष या रोमांचक सामन्यांकडे लागले आहे. अफगाणिस्तान संघ आपली ताकद दाखवून इतिहास रचतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे!

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment