---Advertisement---

500 वर्षानंतर तयार होतोय केदार योग; ‘या’ राशींना होणार फायदा

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । ४ एप्रिल २०२३। राशीचक्रात ग्रहांचं गणित वेळोवेळी बदलत असतं. एखादी स्थिती पुन्हा कधी परत तशीच येईल सांगता येत नाही. अनेकदा काही योग शेकडो वर्षानंतर जुळून येतात. असाच एक दुर्लभ योग  500 वर्षानंतर जुळून येणार आहे. 23 एप्रिलला दुर्लभ असा केदार योग तयार होणार आहे. या योगामुळे अचानक धनलाभ आणि करिअरमध्ये प्रगती झपाट्याने होताने दिसते. तर या योगाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मेष रास 
या राशीत चार ग्रह एकत्र येणार आहेत. दुसऱ्या स्थानात शुक्र असणार आहे आणि तिसऱ्या स्थानात मंगळ आणि चंद्र असेल. तर शनिदेव अकराव्या स्थानात असणार आहे. त्यामुळे अचानक धनलाभ होऊ शकतो. समाजात मान सन्मान वाढेल. इंक्रिमेंट आणि प्रमोशनचा योग जुळून येईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.

सिंह रास 
या राशीच्या जातकांना केदार योगाचा फायदा होईल. या राशीच्या गोचर कुंडलीतील सप्तम, नवम, दशम आणि अकराव्या स्थानात केदार योग तयार होत आहे.  जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. व्यापाऱ्यांना या काळात चांगल्या ऑर्डर्स मिळतील. मित्र परिवाराकडून चांगली मदत होईल. कौटुंबिक कलह दूर होतील आणि आनंदाचं वातावरण राहील.

कर्क रास 
या राशीला ग्रहमान आणि केदार योगाचा फायदा होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नतीचा योग आहे. आर्थिक नियोजन करण्यासाठी हा काळ उत्तम राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील.

मकर रास
 या राशीच्या जातकांना केदार योगाचा फायदा होईल.  वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. या काळात तुम्ही एखादा नवा बिझनेस करू शकता. यामुळे तुम्हाला फायदा होईल. गुंतवणुकीतून चांगला लाभ या काळात अपेक्षित आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी आनंदाचा राहील.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment