---Advertisement---
मुंबई : सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये घेऊ नये. त्यामुळे ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय होणार आहे. आम्ही ओबीसी नेते हे खपवून घेणार नाही” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकश शेंडगे यांनी दिला. “आम्ही भुजबळांना सांगितलं, तुम्ही मंत्रिमंडळात राहून संघर्ष करा. राजीनामा देऊन बाहेर पडू नका. आम्ही बाहेर राहून संघर्ष करु” असं प्रकाश शेंडगे म्हणाले.
“ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असा महाराष्ट्र सरकारने शब्द दिला होता. आधी सांगितलं, निजामाच्या नोंदी शोधत आहोत. सुरुवातीला 5 हजार, 11 हजार नोंदी निघाल्या, आम्ही मान्य केल्या. आता शिंदे समितीला संपूर्ण महाराष्ट्रात नोंदी शोधण्याच काम लावलं आहे. “हा संघर्ष आमच्या हक्काच्या आरक्षणाच संरक्षण करण्यासाठी आहे. सगळे ओबीसी भटके, विमुक्त रस्त्यावर उतरुन लढा सुरु करणार आहोत. दिवाळी संपली की, राज्यभर आंदोलन सुरु करणार आहोत” असं प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं.
मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन मागासवर्गीय ठरवायच हे षडयंत्र हाणून पाडणार” असं प्रकाश शेंडगे म्हणाले. “सुप्रीम कोर्टाने मराठा समाज मागस नाही हे दाखवून दिलय. आता कुणबी दाखले देऊन मागासवर्गीय होतो का?. जात बदलण्याचा अधिकार कोणाला नाहीय. आम्ही न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय सुद्धा केलाय. अशा प्रकारे कुठली समिती नेमून मागासवर्गीय ठरवू शकत नाही. एखाद्या समाजाला मागास ठरवण्याची प्रक्रिया असते. राज्य मागासवर्गीय आयोग आहे” असं प्रकाश शेंडगे म्हणाले.
आम्हाला आमच्या हक्काच रक्षण करण्यासाठी रस्त्यावर याव लागेल. दिवाळीनंतर 17 तारखेला अंबडला, त्यानंतर 26 नोव्हेंबरला हिंगोलीला दुसरा मेळावा होईल” असं प्रकाश शेंडगे म्हणाले. “आम्ही आमची संख्या दाखवून देऊ. ओबीसी रस्त्यावर येऊ शकत नाही असं समजू नये. मरणाची लढाई लढण्याची पाळी आली तरी चालेल. गरीब, ओबीसी समाजाचा आरक्षणचा संरक्षण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्ही मतपेटीतून आमची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही शेंडगे यांनी दिला आहे.