---Advertisement---

रविंद्र वायकर नंतर आता राजन विचारेंच्या घरी ईडीची धाड

---Advertisement---

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्या लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी ४ वाजता निकाल जाहीर करतील. अशातच आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत. आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीने वायकर यांच्या ७ ठिकाणांवर ही छापेमारी केल्याची माहिती आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या घरांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment