अहमद कादरी नरेंद्र मोदींना असे काही बोलले की सगळेच अवाक्…

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील राजभवनात पद्म पुरस्कार सोहळा मोठ्या-उत्साहात आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कादरी यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच पद्म पुरस्कारप्राप्त महान व्यक्तींची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी, एकामागोमागे एक सर्वांचं अभिनंदन करत असताना पंतप्रधान मोदी हे शाह रशीद अहमद कादरी यांच्यापर्यंत पोहोचले. यावेळी, दोघांमध्ये झालेला संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाह रशीद अहमद कादरी यांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

व्हायरल व्हिडिओत शाह कादरी हे मोदींचे आभार मानताना दिसत आहेत. तसेच, मला काँग्रेसचं सरकार असताना पद्म पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. भाजपचं सरकार आल्यानंतर मी अपेक्षाच सोडून दिली होती. मात्र, तुम्ही मला चुकीचं ठरवलंत, असे कादरी यांनी म्हटले. त्यावेळी, मोदींनी हसत हसत, त्यांच्या हातावर टाळी दिली. तसेच, कादरी यांचे अभिनंदन करत ते पुढे निघून गेले.

शाह कादरी यांनी ५०० वर्षे जुनी बिदरी कला जिवंत ठेवली आहे. त्यांना कर्नाटकचे शिल्पगुरू म्हणून संबोधले जाते. बीदरी एक लोककला असून शाह कादरी हे अनेक वर्षांपासून बीदरी कलेची भांडे बनवत आहेत.