जळगाव । सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत असून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वेकडून विशेष गाड्या चालविल्या जात आहे. अशातच रेल्वेने अहमदाबाद ते पुरी दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष या गाडीला भुसावळसह जळगाव रेल्वे स्थानकावर थांबा आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली आहे.
या विशेष एक्स्प्रेसच्या केवळ दोनच फेऱ्या होणार आहेत. ०९४५३ अहमदाबाद- पुरी ही १० मे रोजी अहमदाबाद येथून सायंकाळी ७.१० वाजता सुटणार आहे. तिसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता ती पुरी येथे पोहचेल. दरम्यान, रेल्वे क्रमांक ०९४५४ पुरी-अहमदाबाद-पाळधी विशेष रेल्वे १२ मे रोजी दुपारी ४.३० वाजता पुरीहून सुटेल
या गाड्या जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, वर्धा, नागपूर, तुमसर रोड, गोंदिया, दुर्ग, रायपूर, लाखौली, महासमुंद, खरियार रोड, कांताबंजी, टिटीलागढ, केसिंगा, मुनीगुडा, रायगडा, पार्वतीपुरम, बोबिली, विजयानगरम रोड, पलासा, ब्रह्मपूर, छतरपूर, खुर्दा रोड आणि साक्षीगोपाल स्टेशनवर थांबेल. या ट्रेनमध्ये 20 स्लीपर क्लास कोच असतील. अहमदाबाद-पुरी विशेष गाडी क्रमांक ०९४५३ ला वडोदरा, सुरत, उधना आणि नंदुरबार स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.