तरुण भारत लाईव्ह । २२ फेब्रुवारी २०२३। सर्व जग आज सत्तासंघर्षात मग्न असताना भारताने मात्र नेहमी सहकार्यालाच प्राधान्य दिलेले आहे. तुर्कीशी फारसे मैत्रीपूर्ण संबंध नसतानाही त्याच्या संकटकाळात भारताने मदत केली. Turkey तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर भारताने केलेल्या मदतीचा संबंध मध्यपूर्वेतील वचनबद्धतेशी जोडला जात आहे. Turkey मध्यपूर्वेतील देशांशी भारताने सुधारलेल्या संबंधाचा हा एक भाग आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताने इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल-सिसी यांना दिलेले निमंत्रण, इस्रायलशी अधिक घट्ट झालेले संबंध, पंतप्रधान मोदींनी २०१७ मध्ये इस्रायलला प्रथमत:च दिलेली भेट आणि आता तुर्कीशी मैत्री घट्ट करण्याचे प्रयत्न हे दर्शवते की, Turkey या क्षेत्रांमध्ये अमेरिकेचे अस्तित्व कमकुवत होत असताना भारत आपले पाय मजबुतीने रोवण्याचा प्रयत्न करीत आहे.
तुर्कीने आजवर भारताऐवजी पाकिस्तानच्या समर्थनात भूमिका घेण्यातच धन्यता मानली. भारत प्रजासत्ताक बनल्यानंतरच्या शीतयुद्धाच्या काळात भारत-पाकिस्तानात दोन युद्धे झाली. Turkey यापूर्वीच तुर्की आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंध १९४८ मध्ये प्रस्थापित झाले होते. सुरुवातीपासूनच भारत आणि तुर्की यांच्यातील घनिष्ठ भागीदारी विकसित होऊ शकली नाही. Turkey काश्मीरच्या बाबतीत तुर्कीची पाकिस्तान समर्थक भूमिका आणि शीतयुद्धात अमेरिकेच्या छावणीत तुर्की असताना भारताने केलेला अलिप्ततेचा पुरस्कार यामुळे या दोन देशात तणाव निर्माण झालेला होता. Turkey दुस-या महायुद्धानंतर १९४९ मध्ये नाटोची स्थापना झाली आणि तुर्की त्याचा सदस्य बनला. त्यावेळी नाटोकडे सोव्हिएत संघविरोधी संघटना म्हणून पाहिले जात असे. याशिवाय तुर्की, इराक, ब्रिटन, पाकिस्तान आणि इराण यांनी मिळून ‘बगदाद करार’ १९५५ मध्ये अस्तित्वात आणला. Turkey बगदाद करार ही संरक्षणात्मक संघटना होती. समान राजकीय, लष्करी आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नाटोच्या धर्तीवर कार्य करण्याचे या संघटनांनी ठरविले होते. Turkey परंतु इराक १९५९ मध्ये बगदाद करारातून बाहेर पडला आणि सेंट्रल ट्रिटी ऑर्गनायझेशन असे नाव या संघटनेने धारण केले.
बगदाद करार सोव्हिएत युनियनच्या विरोधातही दिसला तर भारत सोव्हिएत युनियनच्या जवळ राहिला. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तुर्गट ओझल यांनी भारतासोबतचे संबंध पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. ओझल यांनी १९८६ मध्ये भारताला भेट दिली होती. Turkey ‘वेस्टर्नर’ आणि ‘लिबरल’ अशी ओझल यांची प्रतिमा बनलेली होती. या भेटीदरम्यान ओझल यांनी दोन्ही देशांच्या दूतावासांमध्ये लष्कराच्या प्रतिनिधींची कार्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यानंतर १९८८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी तुर्कीला भेट दिली होती. राजीव गांधी यांच्या भेटीनंतर दोन्ही देशांमधील संबंध अनेक आघाड्यांवर सुधारले. पण असे असतानाही काश्मीरच्या बाबतीत तुर्कीची भूमिका पाकिस्तानच्या बाजूने राहिल्याने संबंधात जवळीक निर्माण झाली नाही. Turkey इस्लामिक को-ऑपरेशन अर्थात ओआयसीच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक १९९१ मध्ये झाली आणि या बैठकीत तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी काश्मीरबाबत भारतावर टीका केली होती. २००३ मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी तुर्कीला भेट दिली होती. Turkey या भेटीत दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये संपर्क कायम ठेवण्याचा करार झाला होता.
तुर्कीचे पंतप्रधान बुलंट इझेव्हेट हे पहिले भारत समर्थक होते. त्यांनी पाकिस्तानमध्ये जनरल परवेझ मुशर्रफच्या सत्तापालटाला मान्यता दिली नव्हती. Turkey इझेव्हेट यांनी एप्रिल २००० मध्ये भारताला भेट दिली होती. १४ वर्षांत तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची ही पहिलीच भेट होती. इझेव्हेट यांनी पाकिस्तानला भेट देण्याचे निमंत्रण नाकारले होते. इझेवेटने काश्मीरबाबत तुर्कीची पारंपरिक भूमिका बदलली. तुर्कीच्या या भूमिकेमुळे भारताशी संबंधात सुधारणा होण्यास मदत मिळाली. Turkey रेसेप तय्यप अर्दोन २००८ मध्ये भारत भेटीवर आले होते. या दौ-यात त्यांनी भारतासोबत मुक्त व्यापार करारावर चर्चा केली होती. भारताने तुर्कीचा पहिला नॅनो उपग्रह २००९ मध्ये पीएसएलव्ही१४ अवकाशात पाठवला होता. Turkey यानंतर २०१० मध्ये तुर्कीचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला गुल यांनी भारताला भेट देऊन अंतराळ संशोधनात सहकार्य वाढविण्याची चर्चा केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापारही वाढू लागला होता. दोन देशांमधील द्विपक्षीय व्यापार २००० मध्ये ५०५ दशलक्ष होता; Turkey जो २०१८ मध्ये ८.७ अब्ज झाला. चीननंतर भारत हा तुर्कीचा पूर्व आशियातील दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा तुर्कीसोबतचा व्यापार एक अब्ज डॉलर्सपर्यंतही पोहोचलेला नाही. Turkey २०१७ मध्ये अर्दोन राष्ट्रपती म्हणून भारतात आले होते. अर्दोन यांच्यासोबत १०० सदस्यीय व्यावसायिक शिष्टमंडळ होते.
पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी एकदाही तुर्कीला भेट दिली नाही. मोदी तुर्कीला न जाण्यामागे पाकिस्तान हाही महत्त्वाचा घटक मानला जातो. याशिवाय तुर्कीने अणू पुरवठादार गट अर्थात एनएसजीमध्ये भारताच्या सदस्यत्वाला विरोध केला होता. तुर्कीची ही भूमिका पाकिस्तानच्या दबावाखाली घेतली जात होती, यात दुमत नाही. तुर्कीची काश्मीरबाबतची भूमिका बदलत असल्याचे काही काळापासून दिसून येत आहे. Turkey याबाबत अर्दोन यांनी काश्मीरबाबत संयमी भूमिका घेतलेली आहे. अर्दोन यांनी यापूर्वीही संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. काश्मीर समस्येचे निराकरण संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार व्हायला हवे, असे ते पूर्वी म्हणायचे. Turkey परंतु, गेल्या वर्षी त्यांची टिप्पणी पूर्णपणे वेगळी होती. मागील वर्षी २० सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्राच्या ७७ व्या आमसभेला संबोधित करताना अर्दोन म्हणाले होते, ७५ वर्षांपूर्वी भारत आणि पाकिस्तान हे दोन सार्वभौम देश बनले, परंतु दोन्ही देशांमध्ये शांतता आणि एकता प्रस्थापित झालेली नाही. Turkey हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही आशा करतो आणि प्रार्थना करतो की, काश्मीरमध्ये योग्य आणि शाश्वत शांतता प्रस्थापित होईल. Turkey भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा उझबेकिस्तानमधील समरकंद येथे शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेनंतर तुर्कीचे अध्यक्ष अर्दोआन यांची भेट घेतली होती.
तुर्की येथे भूकंपाने निर्माण झालेल्या संकट काळात भारताने भरघोस मदत केली आहे. Turkey आता तरी तुर्की आपली वृत्ती बदलणार का? हा महत्त्वाचा प्रश्न शिल्लक राहतो. Turkey तुर्की आणि भारत दोन्ही मध्यम शक्ती आहेत आणि दोघेही जागतिक शक्ती बनू इच्छित आहेत. रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर मध्यम शक्ती असलेल्या देशांचे महत्त्व वाढले आहे. भारत आणि तुर्की हे दोन्ही देश युक्रेन संकटावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. Turkey कधी कधी दोन्ही देशांचे हित एकमेकांच्या हितसंबंधाच्या आड येते. पाकिस्तानच्या जवळ असल्याने भारताने तुर्कीला मदत पाठवली नसती तर ते मूर्खपणाचे ठरले असते. भारत तेथे मानवतावादी मदत पाठवत आहे. त्याचा द्विपक्षीय संबंधांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. परंतु इतके असले, तरी भारताच्या मानवतावादी मदतीमुळे तुर्कीचे परराष्ट्र धोरण दीर्घकाळात पूर्णतः बदलेल, हाही भाबडा विश्वास ठरू शकतो. Turkey तुर्कीमधील सध्याची सत्ता इस्लामचे राजकारण करते.
Turkey पाकिस्तान हा दोन्ही देशातील हितसंबंधाच्या मध्ये असलेला महत्त्वपूर्ण बिंदू राहणार आहे. अर्दोन यांनी संयुक्त राष्ट्रात काश्मीरबाबत भारताविरुद्ध बोलणे बंद केले तर सकारात्मक चित्र निर्माण होऊ शकते. तुर्की भारतासाठी अतिशय महत्त्वाचे क्षेत्र आहे. तेथून मध्य आशियात जाणे सोपे जाते. हा देश युरोपच्या सीमेला लागून आहे. Turkey मध्य पूर्वेतील प्रवेश त्याच्यामुळे शक्य होतो. त्याच्याकडे ऑटोमन साम्राज्याचा वारसा आहे. म्हणूनच त्याला इस्लामिक जगाचा नेता बनायचे आहे. Turkey तुर्कीला पाकिस्तानचा काही फायदा नाही, पण इस्लामच्या नावावर एकत्र येणे त्याला भाग आहे. भारत ही उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे आणि तुर्की त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. भारताने तुर्कीला केलेली मदत पाकिस्तानला धडकी भरवणारी आहे. Turkey सौदी आणि यूएईप्रमाणे तुर्कीही भारताच्या पक्षात जाऊ शकते, असे पाकिस्तानला वाटते. तुर्कीमध्ये भारताची मदत ही जागतिक गुरूची प्रतिमा मजबूत करेल, याची त्याला भीती वाटू लागली आहे.