तरुण भारत लाईव्ह । ८ मे २०२३। संपूर्ण महाराष्ट्रात सुवर्णनगरी म्हणून प्रसिध्द असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठलाय. सध्या 24 कॅरेट सोन्याचे दर 61,300 (विनाजीएसटी)रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे. तर जीएसटीसह सोन्याचा दर 63,500 रुपयापर्यंत विकला जात आहे. परंतु
आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळवला आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्याने स्थानिक बाजारपेठेत सोन्याचे दर वाढले आहेत.
दुसरीकडे चांदीच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास दोन दिवसापूर्वी सराफ बाजारात चांदीचा एक किलोचा दर 77,800 रुपये (विनाजीएसटी) प्रति किलोवर विकला जात होता. मात्र त्यात गेल्या दोन दिवसात घसरण झालेली दिसून येतेय. सध्या चांदीचा एक किलोचा दर 76,800 रुपये (विनाजीएसटी) विकला जात आहे.