Roshni Songhare : बालपणीचे स्वप्न पूर्ण करून ती बनली एअर होस्टेस; पण काळाने केला घात

---Advertisement---

Roshni Singhre : अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करून एअर होस्टेस बनलेल्या रोशनी सोनघरे हिचा ही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे देशावर (भारत) दुःखाचे डोंगर कोसळले असून, देशभरात हळहळ व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील डोंबिवली येथील रहिवासी रोशनी लहानपणापासूनच एअर होस्टेस बनू इच्छित होती आणि त्यासाठी तिने खूप कष्ट केले. तिचा प्रवास १०x१० च्या खोलीपासून सुरू झाला. रोशनीचे वडील तंत्रज्ञ आहेत, पण त्यांनी त्यांच्या मुलीच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. अखेर, दोन वर्षांपूर्वी रोशनी एअर होस्टेस बनली आणि स्पाइसजेटमध्ये दोन वर्षे काम केल्यानंतर, ती एअर इंडियामध्ये सामील झाली.

रोशनी दोन दिवसांपूर्वीच आली होती गावी

रोशनी दिवसांपूर्वीच तिच्या गावी गेली होती. ती तिच्या आजी-आजोबा, काका-काकूंना भेटली. गावातील मंदिरात कुलदेवतेचे दर्शनही घेतले. त्यानंतर तिने लंडनला जाणारी विमान पकडली. विशेषतः या वर्षी कुटुंब रोशनीचे लग्नही निश्चित करणार होते.

रोशनीच्या मृत्यूची माहिती आईला देण्यात आली नाही

रोशनीच्या काकांनी सांगितले की, रोशनीच्या आईला त्यांनी याबाबत अद्याप काहीही सांगितले नाही, कारण तिला बीपीचा त्रास आहे. तिचा धाकटा भाऊ नौदलात तैनात आहे. अशा परिस्थितीत, फक्त मोठा भाऊ आणि वडील रोशनीचा मृतदेह घेण्यासाठी अहमदाबादला गेले.

दरम्यान, रोशनी सोनघरेसाठी फ्लाइट अटेंडंटची नोकरी ही फक्त एक नोकरी नव्हती, तर तिचे प्रेम होते. तिला आकाश खूप आवडायचे. ती फ्लाइटने कुठेही जायची, ती इन्स्टाग्रामवर त्याबद्दल माहिती शेअर करायची. रोशनीचे ‘स्काय लव्हज हर’ या इंस्टाग्राम अकाउंटवर ५४ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती या अकाउंटवर ट्रॅव्हल व्लॉग बनवत असे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---