---Advertisement---
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विरोधात अत्यंत कठोर भूमिका घेत नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) क्रू शेड्यूलिंग विभागाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ प्रभावाने हटवण्याचा निर्देश दिला आहे. सुरक्षा मानकांच्या उल्लंघनासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
चुरासिंह (विभागीय उपाध्यक्ष) पिंकी मित्तल (मुख्य व्यववस्थापक क्रू शेड्यूलिंग) आणि पायल अरोडा (कू शेड्युलिंग प्लॅनिंग), अशी कारवाई करण्यात आलेल्या अधिका-यांची नावे आहेत. क्रू शेड्यूलिंगच्या जबाबदारीतून या तीनही अधिकान्यांना तत्काळ हटवण्यात यावे, असा निर्देश डीजीसीएने दिला आहे. या अधिकान्यांची बेजबाबदार कृती आढळली आहे.
---Advertisement---
अनधिकृत आणि नियमाबाह्य पद्धतीने चालक दलाच्या सदस्यांची तैनाती, परवानाना आणि चालक दलाच्या सदस्यांच्या आरामाबाबच्या नियमांचे उल्लंघन आणि निगराणी व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्या असल्याचे शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या या आदेशात म्हटले आहे. अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर हा आदेश देण्यात आला. या अपघातात २७० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांत केवळ विमानातील प्रवासी व चालक दलाचे सदस्यच नव्हे, तर जमिनीवरील लोकांचाही समावेश होता.
या अधिका-यांना सध्याच्या कर्तव्यावरून हटवण्यात यावे, असे डीजीसीएने आदेशात म्हटले आहे. या अधिकाऱ्यांच्या विरोधात अंतर्गत शिस्तपालन कारवाई सुरू करून त्याबाबतच्या चौकशीचा अहवाल १० दिवसांच्या आत डीजीसीएला सोपवण्याचा आदेश देण्यात आला. पुढील सूचना मिळेपर्यंत या अधिकाऱ्यांना उड्डाण सुरक्षा आणि चालक दलाच्या सदस्यांवर होईल, अशा प्रकारचे कोणतेही काम दिले जाऊ नये, असे पात म्हटले आहे.
एअर इंडियाला ‘कारणे दाखवा’ नोटीस
या व्यतिरिक्त डीजीसीएने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. बंगळुरू येथून लंडनला जाणाऱ्या दोन उड्डाणांसाठी ही नोटीस जारी करण्यात आली. या नोटीसला सात दिवसांत उत्तर द्यावे, असे यात म्हटले आहे. कंपनीच्या विरोधात विमान अधिनियम आणि नागरी विमानन नियमांच्या अंतर्गत का कारवाई करू नये, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.