एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग, काय आहे कारण ?


Air India plane emergency landing : फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने या विमानाचे आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आले असून, विमानातील १५६ प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, थायलंडच्या फुकेत बेटावरून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली होती. माहिती मिळताच, तातडीने विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव विमानातील १५६ प्रवाशांना खाली उतरवण्यात असून, संपूर्ण विमानाची तपासणी केली जात आहे.

इराण-इस्रायल युद्धामुळे परतले विमान

इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. यामुळेच भारतातून जाणारी अनेक विमाने वळवण्यात आली असून, अनेक विमाने राजधानी दिल्लीला परतत आहेत. दरम्यान, एअर इंडियाने प्रवाशांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.

अहमदाबादमध्ये झाला होता मोठा अपघात

एअर इंडियाच्या या विमानाला बॉम्बने उडवण्याच्या धमकीच्या एक दिवस आधी गुरुवारी (१२ जून) रोजी दुपारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाला होता. या अपघातात तब्बल २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला, सुदैवाने एक प्रवासी बचावला. या घटनेनंतर एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याच्या धमकीने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---